नांदेड येथे विविध मागण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांना निवेदन
नांदेड, १० डिसेंबर (वार्ता.) – धर्मांतरबंदी, लव्ह जिहादविरोधी आणि गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, तसेच खासगी बस ट्रॅव्हल्सकडून जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी परिवहन खात्याने कठोर निर्णय घ्यावेत या मागण्यांसाठी नांदेड उत्तरचे आमदार श्री. बालाजी कल्याणकर (बाळासाहेबांची शिवसेना पक्ष) यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदने देण्यात आली. या प्रसंगी श्री. मनोहर देशपांडे आणि श्री. राधाकृष्ण पांपटवार उपस्थित होते.