सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील दुसरा खंड !
परात्पर गुरु डॉक्टरांचे व्यक्तीमत्त्व हे आदर्श शिष्य, सर्वाेत्तम गुरु, थोर लेखक, विविध कलांच्या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती करण्याविषयीचे मार्गदर्शक, अध्यात्मजगतातील संशोधक, धर्मसंस्थापक, प्रभावी हिंदूसंघटक, हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुशोभित आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र साधक, शिष्य, संत, लेखक, कलाकार, संशोधक, राष्ट्रभक्त, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अशा सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या चरित्र मालिकेतील दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला आहे. हा खंड ‘आदर्श शिष्य’ बनण्यासाठी जिज्ञासू, हितचिंतक, साधक आदींना लाखमोलाचे दिशादर्शन करणारा असल्याने प्रत्येकाने तो संग्रही ठेवावा.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
ग्रंथाचे मनोगत
‘शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) नेहमी सांगत, ‘संतांना लुटायच्या दोन गोष्टी आहेत – नाम आणि सेवा !’ डॉ. आठवले यांनी गुरूंकडून या दोन गोष्टींची भरपूर लयलूट केली; कारण गुरूंच्या सहवासात त्यांचा अखंड नामजप होत असे आणि ‘नेमले या चित्ता तुझ्या सेवे नाथा । नुरे कार्य आता आणिक ते ।।’, ही त्यांची वृत्तीच बनली होती ! त्यांनी गुरुचरणी तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली; म्हणूनच गुरूंनीही त्यांना म्हटले, ‘डॉक्टर, मी तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले !’
डॉ. आठवले गुरूंकडे गेल्यावर तेथील शौचालयांची स्वच्छता करण्यापासून गुरूंचे पथ्य-पाणी सांभाळण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या सेवा तहान-भूक विसरून करायचे. ते गुरु सांगतील ते तात्काळ करायचेच; पण ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, या भावानेही अनेक सेवा स्वतःहून यथायोग्य करायचे. यासाठी प.पू बाबांना ते नेहमी जवळ लागायचे. गुरुसेवा करतांना त्यांच्यात असलेली गुरुसेवेची तळमळ, भाव, प्रीती, नेतृत्व, व्यापकता अशा विविध गुणांचे दर्शन या ग्रंथातून होते. त्यांनी केवळ स्वतःच गुरुसेवा केली नाही, तर साधकांनाही सेवेची संधी दिली; इतकेच नव्हे, तर त्यांनाही सेवेच्या माध्यमातून घडवले.
शिष्य जेव्हा आपले तन-मन-धन गुरूंना अर्पण करतो, तेव्हा त्याच्या मालकीची प्रत्येक वस्तू, इतकेच नव्हे, तर त्याच्या मनातील प्रत्येक विचारही गुरूंचाच असतो. डॉक्टरांचीही स्थिती अशी असायची. त्यांच्या मनातील प्रत्येक विचार हा प.पू. बाबांचाच असल्याची प्रचीती त्यांना येत असे. यावरून ‘डॉक्टरांचे शिष्यत्व किती उच्च कोटीचे होते’, हे लक्षात येते. त्यांच्या शिष्यत्वाच्या विविध छटा दर्शवणारा हा ग्रंथ साधकांना ‘आदर्श शिष्य’ बनण्यासाठी लाखमोलाचा आहे.
एक आदर्श शिष्यच गुरूंच्या कार्याचे दायित्व परिपूर्णरित्या सांभाळू शकतो. प.पू. बाबांचे गुरुपौर्णिमा महोत्सव, अमृत महोत्सव यांसारख्या मोठमोठ्या सेवांचे दायित्व डॉक्टर एवढे उत्तम सांभाळायचे की, त्या सर्व सेवा अगदी चोख होत असत. गुरूंची शिकवण समष्टीपर्यंत पोचवण्याची विलक्षण तळमळ आणि त्यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची डॉक्टरांची जिद्द यातून लक्षात येत असे. त्यामुळे प.पू. बाबा डॉक्टरांवर पुष्कळ प्रसन्न होत असत, त्यांचे जाहीररित्या कौतुक करत असत आणि त्यांना कार्यासाठी आशीर्वादही देत असत. गुरूंच्या आशीर्वादामुळे डॉक्टरांची अल्पावधीतच पुष्कळ आध्यात्मिक उन्नती झाली आणि त्यांनी आरंभलेल्या अध्यात्मप्रसारकार्याचा वेलू आज जणू गगनाला भिडत आहे ! अशा शिष्यरूपातील डॉ. आठवले यांचा हा साधनाप्रवास सर्वच साधकांसाठी साधनापथावरील दीपस्तंभच आहे.
आज डॉक्टरांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी असतांनाही ते म्हणतात, ‘मला तर प.पू. बाबांचे शिष्य होऊन त्यांची सेवा करण्यासाठी पुनःपुन्हा जन्म घ्यायला आवडेल !’ ‘अशा आदर्श गुरुसेवक आणि उत्तम शिष्य यांचे दर्शन घडवणार्या या ग्रंथाच्या अध्ययनाने आपल्यातही सेवाभाव आणि शिष्यभाव लवकर निर्माण होऊन आपली शीघ्र आध्यात्मिक उन्नती होवो’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– (पू.) श्री. संदीप आळशी (२.९.२०२२)
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधनाप्रवास’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील द्वितीय खंड !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व
ऑनलाईन खरेदीसाठीhttps://sanatanshop.com/product/marathi-paratpar-guru-dr-athavale-and-his-guruseva/ स्थानिक संपर्क : ९३२२३ १५३१७ |