परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही तळहातांवरील रेषा खूप वाढण्यामागील कारण
सर्वसामान्य मनुष्याच्या तुलनेत दान करणार्या श्रीमंत व्यक्तीच्या हस्तरेषा अधिक असतात. दान करणार्या श्रीमंत व्यक्तीच्या तुलनेत चांगल्या राजाच्या हस्तरेषा अधिक असतात. महान संत आणि गुरु यांच्या हस्तरेषा चांगल्या राजाच्या तुलनेत अधिक असतात. महान संत आणि गुरु यांच्या तुलनेत अवताराच्या तळहातावरील रेषा अधिक असतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असल्याने त्यांच्या तळहातावर रेषा अधिक आहेत. आता हिंदु राष्ट्र जवळ येत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक अशा सर्व देवतांचे तत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात वाढत असल्याने त्यांच्या तळहातावरील रेषाही वाढल्या आहेत. त्यांच्या तळहातावर रेषा वाढणे, हे त्यांच्यातील अनेक देवतांचे तत्त्व कार्यरत झाल्याचे प्रतीक आहे.
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, १३.१०.२०२१, स. १०.४८)