सातारा जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायती बिनविरोध !
उर्वरित २४२ गावांमध्ये सरपंचपदासाठी ६५५ उमेदवार
सातारा, १० डिसेंबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी पार पडल्या आहेत. २४२ गावांमध्ये सरपंचपदासाठी ६५५ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १ सहस्र ८१२ जागांसाठी ३ सहस्र ८९७ जणांनी सदस्यपदासाठी अर्ज प्रविष्ट केला आहे. जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती अशा आहेत की, जिथे सरपंचपदासाठी एकही अर्ज प्रविष्ट करण्यात आलेला नाही. सातारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी १० गावांमध्ये बिनविरोध निवडी झाल्या असून १२ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. आता २६ सरपंचपदांसाठी ६८ जण निवडणूक मैदानात आहेत, तर २०४ सदस्य पदांसाठी ४४७ जण रिंगणात आहेत.