रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे डॉक्टर तरुणीचे १०० जणांनी घरात घुसून केले अपहरण !
पोलिसांनी काही घंट्यांतच केली सुटका !
रंगारेड्डी (तेलंगाणा) – येथील आदिबाटला भागात २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचे १०० हून अधिक लोकांनी घरात घुसून अपहरण केले. तरुणीच्या वडिलांना मारहाण, तसेच त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली. पोलिसांनी काही घंट्यांतच तरुणीची सुटका करत सुरक्षित तिला घरी पोचवले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या तरुणीचे नाव वैशाली आहे. ती दातांची डॉक्टर आहे.
रंगा रेड्डी में 100 से अधिक लोगों ने किया महिला डॉक्टर का अपहरण, घर में घुसकर तोड़फोड़- HM Newshttps://t.co/Ljh3Ml9ae5
— Hindmata Mirror ( HM NEWS ) (@hindmatamirror) December 10, 2022
नवीन रेड्डी नावाच्या व्यक्तीवर जमावाचे नेतृत्व केल्याचा आणि मुलीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. तो या तरुणीला त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्रास देत होता. पोलिसांनी मुख्य आरोपी नवीनसह १८ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाएका डॉक्टर तरुणीचे अशा प्रकारे अपहरण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे कि नाही ? |