बलात्काराच्या प्रकरणी केरळमधील सत्ताधारी माकपच्या युवा नेत्याला अटक
थिरूवनंतपूरम् (केरळ) – एका १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी केरळ पोलिसांनी ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’चा स्थानिक नेता जिनेश जयन याला ७ डिसेंबरला विलावुरक्कल मलयाममधील जिनेश भवन येथून अटक केली. या वेळी त्याच्याकडून त्याने अनुमानेे ३० महिलांशी ठेवलेल्या लैंगिक संबंधांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यांतील काही व्हिडिओंमध्ये जिनेश जयन हा मुलींना अमली पदार्थ खाऊ घालतांनाही दिसत आहे. ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’ ही सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा आहे.
Kerala: Eight, including CPIM’s youth wing leader, arrested for sexually abusing minor; shocking visuals discovered on the phonehttps://t.co/hkjUOyQoJ5
— OpIndia.com (@OpIndia_com) December 9, 2022
संपादकीय भूमिकासाम्यवाद्यांचा बरबटलेला इतिहास पहाता साम्यवादी केरळ सरकारकडून अशांवर कारवाई होणे दुरापस्तच होय ! |