उत्तरप्रदेशातील मुसलमान पोलीस जिहादी झाकीर नाईक याचे समर्थन करणार्या फेसबुकच्या गटात !
माहिती उघड झाल्यानंतर पोलीस शिपयाने बंद केले फेसबुक खाते !
ललितपूर (उत्तरप्रदेश) – येथे पोलीस शिपाई मुशीर खान याने जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या झाकीर नाईक याचे समर्थन केले आहे. खान याच्या फेसबुक खात्यावर त्याने या संदर्भात शेअर केलेली पोस्ट दिसत आहे. यात धर्मांतराचाही उल्लेख आहे. मुशीर खान याने केलेले हे कृत्य समोर आल्यानंतर त्याने त्याचे फेसबुक खाते बंद केले आहे.
बुर्के में ‘रामायण वाली सीता’, धर्मांतरण वाले पोस्ट … ज़ाकिर नाइक का फैन निकला यूपी पुलिस का कॉन्स्टेबल मुशीर खान, पोल खुलने पर बंद किया फेसबुक#Lalitpur #UPPolice #ZakirNaikhttps://t.co/2c2hlVEu6S
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 10, 2022
सीतापूर येथील एका मंदिराचे महंत बजरंग मुनी उदासीन यांनी मुशीर खान याच्या फेसबुक खात्यावरील या पोस्टचे चित्र प्रसारित केले आहे. मुशीर खान ज्या फेसबुक खात्याशी जोडला आहे त्याचे नाव ‘डॉ. झाकीर नाईक यांचे समर्थन करणार्यांचा गट’ असे आहे. या गटामध्य ४ लाख १५ सहस्र जण जोडलेले आहेत. यात मुशीर खान हाही आहे.
“भारत सरकार द्वारा वांछित जाकिर नाईक का फैन है @Uppolice के @lalitpurpolice में पोस्टेड कांस्टेबल मुशीर खान”
जाकिर नाईक के चाहने वालों के ग्रुप का मेंबर भी है. शेयर करता है धर्मांतरण वाले कंटेंट.
रामायण की सीता @ChikhliaDipika को घोषित कर दिया इस्लाम में कनवर्ट. pic.twitter.com/bHDUh1pVs0
— महंत बजरंग मुनि (@BabaBajrangMuni) December 9, 2022
“हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक” |
महंत बजरंग मुनी उदासीन यांनी याविषयी ट्वीट करून मुशीर खान आतंकवाद्यांच्या संपर्कात असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून खान याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका‘पोलीस दलातील कर्मचारी काय करत आहेत ?’, हे पोलिसांना ठाऊक नसेल,तर कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहू शकेल का ? अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! |