भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अनुमती नाकारल्याने रहित !
|
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे ११ डिसेंबरला होणार्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीचे प्रकाशन करण्याच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याने तो रहित करण्यात आला आहे. हे कळवण्यास आम्हाला खेद वाटत आहे, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. पोलिसांनी सभागृहाच्या प्रमुखांवर दडपण आणून त्यांना सभागृहाची अनुमती रहित करण्यास भाग पाडले. समितीने कार्यक्रमाची लेखी अनुमती मागितली होती. या अर्जावर कार्यक्रम रहित करण्यात येत असल्याची कोणतीही लेखी सूचना न देताच कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडण्यात आले. या कार्यक्रमाला तेलंगाणाचे माजी पोलीस महासंचालक आणि राज्याचे रस्ते सुरक्षा अन् प्राधिकारण यांचे अध्यक्ष टी. कृष्णा प्रसाद आणि आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्य सचिव एल्.व्ही. सुब्रह्मण्यम् प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित रहाणार होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
समितीने म्हटले आहे की, राष्ट्रीय धोक्याविषयी आणि कोणत्याही धर्माविषयी काहीही न सांगणारा हा ग्रंथ संपूर्ण भारतात कोणताही वाद न होता इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कन्नड भाषांमध्ये सुरळीतपणे प्रकाशित करण्यात आला. असे असतांना तेलंगाणा पोलिसांनी मात्र आम्हाला या ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडले. भारतातील तथाकथित लोकशाहीची सद्य:स्थती आणि बहुसंख्य हिंदूंची अवस्था हीच आहे, जी तुम्हाला बोलू देत नाही.
संपादकीय भूमिका
|