अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्या धर्मांधाला अटक
लक्ष्मणपुरी – अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणारा वसीउल्लाह खान (वय २३ वर्षे) याला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी भारत-नेपाळ बढनी नाक्यावरून अटक केली. खान एका हिंदु मुलीला नेपाळ येथे पळवून घेत जात होता. खान हा गुजरातमधील, तर पीडित मुलगी उत्तरप्रदेशमधील रहिवासी आहे.
खान हा पीडित हिंदु मुलीला घेऊन ९ डिसेंबरला सकाळी अनुमाने १०.३० वाजता बढनी नाक्यावर पोचला. त्या दोघांच्या हातात सामान असल्याने ते दूरच्या प्रवासाला जात असल्याचा संशय सैनिकांना आला. सैनिकांनी त्यांना अडवून काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची खान समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे सैनिकांचा संशय बळावला. यानंतर दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद्यांना रोखण्यासाठी सरकार आता तरी कठोर कायदा करणार का ? |