राज्यघटनेची शपथ घेणारी कोणतीही व्यक्ती कधीही समान नागरी कायद्याला विरोध करणार नाही !
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांची स्पष्टोक्ती
नवी देहली – राज्यघटनेची शपथ घेणारी कोणतीही व्यक्ती कधीही समान नागरी कायद्याला विरोध करणार नाही, असे परखड मत केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मांडले.
केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने कहा, संविधान की शपथ लेने वाला कोई शख्स समान नागरिक संहिता का विरोधी कैसे हो सकता है #AgendaAajtak22 https://t.co/X1ou6dWAI5
— AajTak (@aajtak) December 9, 2022
राज्यपाल खान म्हणाले की, समान नागरी कायदा हा विवाह, प्रथा किंवा परंपरा यांच्यापुरता मर्यादित नाही, तर समान न्यायाविषयी आहे. दोन पत्नी करण्यासाठी धर्मांतर केले जाते, अशी काही प्रकरणे आहेत. येथे समानता दिसत नाही. ते पुढे म्हणाले की, भारतात बुरखा घालण्यावर बंदी नाही; मात्र शाळा किंवा महाविद्यालये यांचे काही नियम असू शकतात. त्यामुळे तेथे हिजाब (स्त्रियांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यावर निर्बंध असू शकतात. ज्यांना हिजाब घालायचा आहे, ते ज्या महाविद्यालयांमध्ये तसे घालण्याची अनुमती आहे, तेथे जाऊ शकतात.