आर्थिक मंदीमुळे श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट
कोलंबो (श्रीलंका) – चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे. श्रीलंकेने पशूंसाठी लागणार्या चार्याच्या आयातीवर बंदी घातल्याने देशात चार्याची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी पोलिसांचे ६ अश्व चार्याविना मरण पावले आहेत. उर्वरित ५० अश्वांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.
चालू वर्षी आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेने विदेशी मुद्रा वाचवण्याच्या उद्देशाने अनेक वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली. यात चारा आणि चार्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणार्या सामुग्रीचाही समावेश आहे. श्रीलंकेत सध्या औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे.