राज्यात ११ ते १४ डिसेंबरला मुसळधार पावसाची शक्यता !
नाशिक – राज्यात ढगाळ वातावरण असल्याने किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडी नाहीशी झाली होती. ८ डिसेंबर या दिवशी किमान तापमानात अंशत: घसरण झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता, तर दक्षिणेतील चक्रीवादळामुळे राज्यात ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
चक्रीवादळामुळे नाशिक, जळगाव, धुळे येथील काही भागांपर्यंत पावसाची शक्यता राहील. पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सिद्ध होणार्या ‘मंडौस (MANDOUS)’ चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात १२ ते १५ डिसेंबर या काळात चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल.