इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे देशाचा इतिहास बळजोरीने इंग्रजी साच्यात बसवण्याचा प्रयत्न करणारे भारतीय पंडित !
‘इंग्रजी शिक्षणपद्धतीने भारतीय पंडितांचे मेंदू सडवून टाकलेत. युरोपच्या इतिहासाच्या साच्यात बसविल्याविना भारताच्या सहस्रशः वर्षांच्या भव्योदात्त चारित्र्याला मूल्यच उरत नाही. अशीच दृढ धारणा आजच्या यच्ययावत् पश्चिम छायेच्या भारतीय विद्वानांची झाली आहे. मॅक्समुलर, विंटरनिझ यांसारखे त्यांचे पाश्चात्त्य गुरु सांगतात, ‘‘आर्य-अनार्यादि तन, पश्चिमेच्या चौकटीत भारताला बसवण्याचा प्रयत्न, असे सगळे आमचे प्रमाद होते; पण भारतीय पंडितांचे मेंदू इतके कुजले आहेत की, ते आपल्या त्या पश्चिमी गुरुलाही मागे सारून ठोकपीट करून भारताचा इतिहास बळजोरीने त्या इंग्रजी साच्यात बसवण्याची शिकस्त करत आहेत. प्रसंगी हात-पाय तोडून ते मर्कट कृत्य करत आहेत. भारताला लक्षावधी वर्षाची त्यांची परंपरा ! एवढा अतिप्रचंड काळ ! वैदिक धर्माच्या क्षत्रिय परंपरेला अनुचित वर्तन करणारा एखादा ‘वेन’ राजासारखा दुष्ट जुलुमी राजा असेलही; म्हणून का भारत बेगुमान हुकूमशहाच्या जुलुमाखाली राबणारा देश होता ?’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०१७)