सलग दुसर्या दिवशीही वन विभागाने विशाळगडावरील अतिक्रमण काढली !
कोल्हापूर – जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर ८ डिसेंबरपासून वन विभागाने विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून दुसर्या दिवशीही ही कारवाई चालू होती. काल विशाळगडाच्या पायथ्याला असलेली आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढली, तर ९ डिसेंबरला वन विभागाच्या हद्दीत असणार्या अवैध पत्र्याच्या शेड, तसेच अन्य बांधकामे हटवण्यात आली.
विशाळगडावरील अतिक्रमण कशाप्रकारे काढावे, या संदर्भात १२ डिसेंबर या दिवशी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होत असून यात नेमका कृती आराखडा ठरवण्यात येणार आहे. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच हे शक्य झाले अशी प्रतिक्रिया आता शिवप्रेमी, पत्रकारही व्यक्त करत आहेत.