ऐतिहासिक स्मारके नेहमीच स्वच्छ हवीत. कधीतरी स्वच्छता होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनेक ठिकाणी ‘ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाची स्वच्छता केली. स्वच्छतेनंतर राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्याला उजाळा देण्यात आला.’