गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘एम्.आय.एम्.’च्या सर्व १३ उमेदवारांची अनमात रक्कम जप्त !
संभाजीनगर – नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘एम्.आय.एम्.’ने १३ जागांवर उमेवार उभे केले होते. त्यांपैकी २ उमेदवार हिंदु होते; पण एकालाही यश मिळाले नाही. सर्व १३ उमेदवारांची अनमात रक्कम (डिपॉझिट) जप्त झाले आहे. निवडणुकीत किमान मतेही मिळवू न शकणार्या उमेदवाराची (त्याने उमेदावारी अर्ज भरतांना भरलेली) अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडून जप्त केली जाते. ही त्या पक्षासाठी मोठी नामुष्की समजली जाते.
आमच्या १३ उमेदवारांना १ लाख मते मिळाली, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे ! – खासदार इम्तियाज जलील
‘एम्.आय.एम्.’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी गुजरातमध्ये प्रचार मोहिमेत सहभाग घेतला होता. तेथील दारूण पराभवाविषयी ते म्हणाले की, आमच्या पक्षाच्या १३ उमेदवारांना मिळून १ लाख मते मिळाली आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा आमचा प्रारंभ आहे. नुकत्याच झालेल्या देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या १५ उमेदवारांना ५० सहस्र मते मिळाली आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.