‘युपीआय’वरील आर्थिक व्यवहाराच्या मर्यादा निश्चित
(‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’ अर्थात् ‘युपीआय’ म्हणजे भ्रमणभाषवरील अॅपद्वारे पैशांची देवाण-घेवाण करण्याची व्यवस्था)
नवी देहली – ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती आता ‘युपीआय’द्वारे प्रतिदिन केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहे. काही लहान बँकांनी ही मर्यादा २५ सहस्र रुपयांपर्यंत, तर ‘गूगल पे’, ‘फोन पे’, ‘अॅमॅझॉन पे’ आणि ‘पे.टी.एम्.’ यांसारख्या आस्थापनांनी ती १ लाख रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. याखेरीज ‘गूगल पे’ने प्रतिदिन १० व्यवहारांची, तर ‘अॅमॅझॉन पे’ने प्रतिदिन २० व्यवहारांची संख्या निश्चित केली आहे. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने या संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.