‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही !
मनसेची चेतावणी
मुंबई – फवाद खान याचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली चालू आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय आस्थापनांनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घातल्या आहेत. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.
या ‘ट्वीट’मध्ये अमेय खोपकर यांनी लिहिले आहे की, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा पाकिस्तानी चित्रपट ‘दी लीजेंड ऑफ मौला जट्ट’ भारतात प्रदर्शित करण्याची योजना अत्यंत संतापजनक आहे. एक भारतीय आस्थापन या योजनेचे नेतृत्व करत आहे. नाही म्हणजे नाहीच. फवाद खान याचे कुणी देशद्रोही ‘फॅन्स’ असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन चित्रपट बघावा.’’