सहजसोपी मोहरी लागवड
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘मोहरीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतात. हिवाळ्याच्या कालावधीत मोहरीची लागवड अवश्य करावी. मोहरीच्या पानांचा उपयोग पालेभाजी करण्यासाठी केला जातो, तसेच हे पीक ‘द्विदल’ असल्यामुळे मातीमध्ये नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा करते. मोहरी हे ‘सापळा पीक (किडींना स्वतःकडे आकर्षित करून मुख्य पिकाला वाचवणारे पीक)’ म्हणूनही उपयुक्त आहे. याच्या पिवळ्या फुलांकडे अनेक कीटक आकर्षित होतात. पालेभाजी करण्यासाठी याची केवळ पाने खुडून घ्यावीत आणि काही रोपे पाने न काढता वाढू द्यावीत. वाढ झालेल्या रोपांना आधी फुले आणि नंतर शेंगा येतात. या शेंगा पूर्ण सुकल्यावर त्यातून मोहरीचे दाणे मिळतात.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२९.११.२०२२)