‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् पारमार्थिक सेवा ट्रस्ट’ यांच्या वतीने आयोजित औदुंबर भंडारा भावपूर्ण वातावरणात पार पडला !
सांगली, ९ डिसेंबर (वार्ता.) – इंदूर येथील ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् पारमार्थिक सेवा ट्रस्ट’ यांच्या वतीने आयोजित औदुंबर भंडारा भावपूर्ण वातावरणात पार पडला. २ डिसेंबरला सांगली येथे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. दिलीप (तात्या) भोसले यांच्या घरी गुरुपादुकांचे दर्शन आणि भंडारा झाला. यानंतर ३ डिसेंबरला औदुंबर येथे दत्त महाराज यांचा पालखी सोहळा, दीपोत्सव, भंडारा आणि भजन असे कार्यक्रम झाले. ४ डिसेंबर या दिवशी औदुंबर येथे प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य प.पू. रामानंद महाराज यांच्या श्रीचरण पादुका स्वामी नारायण मठातून पालखीद्वारे औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात नेण्यात आल्या. या वेळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजने म्हणण्यात आली. कृष्णा नदीच्या काठावर पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर दुपारी भंडारा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. (सौ.) कुंदा आठवले या उपस्थित होत्या.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शरद बापट, प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. दौलतराव (धनी) लोंढे, श्री. दिलीप (तात्या) भोसले यांच्यासह अन्य मान्यवरउपस्थित होते. ४ डिसेंबरला सांगली येथे सौ. रेखा जाधव यांच्या घरी भंडारा झाला. यानंतर ५ डिसेंबरला श्री. दौलतराव (धनी) लोंढे यांच्या घरी पादुकापूजन आणि दुपारचा भंडारा पार पडल्यानंतर पादुका पुणे येथे अन् तेथून पुढे ६ डिसेंबरला इंदूर येथील आश्रमात नेण्यात आल्या.
लिंक – https://sanatanprabhat.org/marathi/631866.html |