(म्हणे) ‘भारतातील हिंदू संपत असल्याने आम्ही मुंबई येथे आक्रमणे करू !’
भ्रमणभाषद्वारे एकाची पोलिसांना धमकी !
संभाजीनगर – ‘हॅलो, मुंबई कंट्रोल रूम, भारतातील हिंदू संपत चालले आहेत. आता आम्ही मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर आणि कुर्ला येथे येऊन आक्रमणे करणार आहोत. घोडबंदरमार्गे मुंबईत येऊ’, अशी भ्रमणभाषद्वारे पोलिसांना धमकी दिली. यानंतर मुंबई ते संभाजीनगर पोलिसांपर्यंत सर्वांचीच झोप उडाली. एम्.आय.डी.सी. वाळूज पोलिसांनी शोध चालू करत जिल्ह्यातील रांजणगाव येथे रहाणारे पंजाब थोरवे (वय ३३ वर्षे) यांना अटक केली. थोरवे यांनी मद्याच्या नशेत ही चूक केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.