पाकमध्ये पोलीस शिपायाने हिंदु तरुणाला मारहाण करत त्याची मोटारसायकल हिसकावली !
जेकोबाबाद (पाकिस्तान) – येथे पोलीस शिपाई अहसान शाहिद याने सतीश कुमार या हिंदु मुलाला मारहाण करत त्याची मोटारसायकल हिसकावून घेतली. या पोलीस कर्मचार्याला निलंबित करून सतीश कुमार याला न्याय द्यावा, अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे, अशी माहिती ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संस्थेचे संस्थापक संयोजक नारायण दास भील यांनी ट्वीट करून दिली आहे.
Jacobabad Sindh: The motor bike of a Hindu boy Satish Kumar was snatched by policeman Ahsan Shahid. Satish was also badly beaten up by Ahsan. SSP Jacobabaad is requested to suspend the policeman and give justice to Satish Kumar#HinduLivesMatter#SaveMinoritiesInPakistan pic.twitter.com/v5eKUusulh
— Narain Das Bheel (@NarainDasBheel8) December 9, 2022
संपादकीय भूमिकापाकमधील असुरक्षित हिंदू ! |