मंगळुरू (कर्नाटक) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात मुसलमान विद्यार्थ्यांकडून बुरखा घालून नाच !
४ विद्यार्थी निलंबित !
मंगळुरू (कर्नाटक) – येथील सेंट जोसेफ अभियांत्रिकी महाविद्यालयात काही मुसलमान विद्यार्थ्यांनी बुरखा घालून नाच केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर महाविद्यालयाने ४ विद्यार्थ्यांना निलंबित केले.
An engineering college in #Mangaluru has suspended four of its students after they were seen performing a dance wearing a burqa.
(@sagayrajp)https://t.co/xXxJuSfGNo— IndiaToday (@IndiaToday) December 9, 2022
या संदर्भात महाविद्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी केलेले नृत्य, हा नियोजित कार्यक्रमाचा भाग नव्हता. त्यामुळे नाचणार्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. समाजातील एकोपा बिघडवणार्या कोणत्याही कृतीला महाविद्यालय पाठिंबा देत नाही.