राष्ट्रध्वज फाडून त्याचा फळा पुसण्यासाठी केला वापर !
सिंहभूम (झारखंड) येथील सरकारी शाळेतील मुख्याध्यापक इक्बाल यांना अटक
सिंहभूम (झारखंड) – घाटशिला येथील सरकारी शाळेतील मुख्याध्यापक असलेले शफक इक्बाल यांनी राष्ट्रध्वजाचा वापर फळा पुसण्यासाठी (डस्टर) म्हणून केल्याची घटना समोर आली आहे. याविषयी गावकर्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शाळेला घेराव घातला. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी मुख्याध्यापक इक्बाल यांना अटक केली. गावकर्यांनी, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी इक्बाल यांना शाळेतून हटवण्याची मागणी केली आहे.
प्रिंसिपल शफक इकबाल ने तिरंगा को फाड़ कर बना दिया डस्टर, साफ़ की कुर्सी भी: पूछने पर कहा – पुराना था, इस्तेमाल कर लिया, सरस्वती पूजा पर लगा चुका है रोक#Jharkhand #Tricolorhttps://t.co/SRGw0MLKKi
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 8, 2022
(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
१. इक्बाल यांनी राष्ट्रध्वज कात्रीने कापून त्याचे तुकडे केले. विद्यार्थ्यांनी ही माहिती घरी जाऊन पालकांना दिली. गावकरी शाळेत पोचल्यावर इक्बाल यांना जाब विचारल्यावर ते म्हणाले की, राष्ट्रध्वज जुना झाला होता, त्यामुळे तो फाडून त्याचे ‘डस्टर’ बनवले. (इक्बाल यांनी कधी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचा असा वापर केला असता का ? – संपादक)
२. गावकर्यांचा आरोप आहे की, पूर्वी विद्यार्थ्यांनी शाळेत श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्याचा प्रयत्न केला असता इक्बाल यांनी ती थांबवली होती. (धर्मांध कितीही शिकले, तरी त्यांच्यातील धर्मांधता नष्ट होत नाही आणि ते सर्वधर्मसमभावाचेही पालन करत नाहीत, हे नेहमीच लक्षात येते ! अशा घटनेविषयी निधर्मीवादी कधीही बोलणार नाहीत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा झाली पाहिजे ! |