हरियाणातील महाविद्यालयाच्या भिंतींवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’ आणि ब्राह्मणविरोधी घोषणा !
सिरसा (हरियाणा) – येथील डॉ. बी.आर्. आंबेडकर महाविद्यालयाच्या बाहेरील भिंतींवर ६ ठिकाणी ‘खलिस्तान झिंदाबाद’, तसेच ‘ब्राह्मणांनो, पंजाब आणि हरियाणा सोडा’, अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीसाठी ब्राह्मणांना उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न झाला होता. देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातही नुकत्याच ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
‘ब्राह्मणों पंजाब-हरियाणा छोड़ो’: JNU के बाद सिरसा के कॉलेज में लिखा, सिख दंगों के लिए बताया दोषी; खालिस्तानी आतंकी पन्नू पर FIR#Haryana https://t.co/AjwjGfamUW
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 8, 2022
पन्नू याने सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात या भिंतींवर लिहिलेल्या घोषणा दाखवल्या आहेत. यात त्याने हरियाणा हा पंजाबचा भाग असल्याचे सांगत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना आव्हान दिले आहे.
संपादकीय भूमिकाखलिस्तानी आतंकवादी कारवाया केवळ पंजाबपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर शेजारील हरियाणामध्येही या आतंकवाद्यांची वळवळ चालू आहे, हे यावरून दिसून येते. त्यामुळे आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे ! |