धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करण्याची मागणी !
पुणे – शहरातील धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी शहरातील धार्मिक स्थळांमधील कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली. महापालिकेच्या मुख्य सभेने वर्ष २००५ आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये धार्मिक स्थळे आणि तालमीचा मिळकत कर माफ करण्यासाठी ठराव संमत केला होता. महापालिकेकडून सर्वसाधारण करामध्ये सवलत देण्यात येते; मात्र पथकर, पाणीपट्टी कर, शैक्षणिक कर मोठ्या प्रमाणात लागू आहे, त्यामुळे त्यांच्यावरील कराचा आणि त्यातून निर्माण होणार्या थकबाकीचा भार वाढत आहे. हे विचारात घेऊन महापालिकेने पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे धार्मिक संस्थांना असणारा कर माफ करण्याचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी धार्मिक स्थळाच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे.