विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ !
कोल्हापूर – ७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अंती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्यास प्रारंभ करू, असे घोषित केले होते. त्याप्रमाणे ८ डिसेंबरला तात्काळ मोहीम राबवत प्रशासनाने विशाळगडाच्या पायथ्याला असलेली आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला आहे.