गोरेगाव (मुंबई) येथे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्याला अटक !
मुंबई – बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्या टोळीतील एका आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव परिसरातील नागरी सुविधा केंद्रावर धाड टाकून पोलिसांनी ३० हून अधिक बनावट आधारकार्ड आणि १५ बनावट पॅनकार्ड जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. गोरेगाव परिसरातील एक जण कागदपत्रांविना १ सहस्र १०० रुपयांना आधारकार्ड आणि पॅनकार्ड देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वरील कारवाई केली.
संपादकीय भूमिकाया टोळीतील सूत्रधाराचा शोध घेऊन फसवणूक करणार्या सर्वांवरच कारवाई करणे अपेक्षित ! |