अकोला येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
अकोला – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती उत्कट भाव असलेले येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचे भाऊ श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी दिली. एका सत्संगात ही आनंदवार्ता देण्यात आली. या वेळी पू. पात्रीकर यांनी श्रीकृष्णाचे चित्र देऊन श्री. राजंदेकर यांचा सत्कार केला.
या सत्संगात रामनाथी आश्रमात जाऊन आलेल्या सनातनच्या साधिका सौ. माया पिसोळकर यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली अत्यंत मौलिक सूत्रे या वेळी सांगितली. यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये प्रथमच रामनाथी आश्रमात जाऊन आलेले श्री. विनायक राजंदेकर यांनीही अत्यंत भावपूर्ण स्थितीत आश्रमातील अनुभव कथन गेले. ते बोलत असतांना ‘आपणही रामनाथी आश्रमातच आहोत’, असाच अनुभव सर्वांनी घेतला. या भक्तीमय वातावरणातच पू. पात्रीकरकाकांनी श्री. राजंदेकर यांच्या आध्यात्मिक पातळीचे गुपित उघड केले. या वेळी सर्व साधक भावविभोर झाले. पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजींना भ्रमणभाषवर ही वार्ता सांगितल्यावर त्यांनाही आनंद झाला.
या वेळी श्री. विनायक राजंदेकर यांची मुले श्री. सुहास आणि श्री. सुनील, तसेच सुना सौ. माधवी आणि सौ. रूचिरा, राजंदेकर यांची मुलगी सौ. सुरेखा शास्त्री, दोन नाती कु. अनुजा, कु. ऋतुजा, तसेच भाऊ श्री. श्याम राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) हे उपस्थित होते.
श्री. विनायक राजंदेकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले असतांना पू. (श्रीमती) कुसुम जलतारे यांना त्यांच्यात जाणवलेला पालट‘विनायक रामनाथी आश्रमात आल्यानंतर मला भेटला. त्या वेळी त्याच्याकडे बघून पुष्कळ स्थिरता आणि चैतन्य जाणवले. त्याच्याकडे पाहून थकवा वाटला नाही आणि ‘त्याच्या अंतर्मनात काहीतरी प्रक्रिया (साधना) चालू आहे’, असे जाणवले.’ – पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संत) (श्री. विनायक राजंदेकर यांची मोठी बहीण) (१८.९.२०२२) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक