श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वाची ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. मोक्षदा मयुरेश कोनेकर (वय ११ वर्षे) हिला आलेली प्रचीती !
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ घरी आल्यावर सुगंध येणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्या घरी आल्यावर घरात मोगरा आणि सोनचाफा या फुलांचा अन् चंदनाचा सुगंध येतो. त्या आमच्या घरातून गेल्यावर सुगंध येण्याचे प्रमाण न्यून होत जाते.
२. आईने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची ओटी भरल्यावर ‘देवीची ओटी भरली’, असे जाणवणे
या वर्षी नवरात्रीत काही कारणाने आम्हाला देवीची ओटी भरता आली नाही. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू घरी आल्यावर माझ्या आईने (सौ. राघवी कोनेकर यांनी) त्यांची ओटी भरली. तेव्हा आईने ‘देवीचीच ओटी भरली’, असे मला जाणवले.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी म्हटलेली भजने ऐकतांना आलेल्या अनुभूती
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी म्हटलेली भजने आम्ही भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित केली आहेत.
अ. ती भजने ऐकतांना ‘साक्षात् सरस्वतीदेवी पृथ्वीवर अवतरली आहे’, असे मला वाटते.
आ. ‘त्यांच्या वाणीतून चैतन्य आणि शांती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवते.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी लिहितांना मला ‘गरुड आकाशात घिरट्या घालत आहे’, असे दिसले. त्या वेळी मला वातावरणात शांतता आणि थंडावा जाणवत होता.
हे श्रीकृष्णा, हे कृपाळू गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुम्हीच माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतली, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मोक्षदा मयुरेश कोनेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ११ वर्षे), फोंडा, गोवा. (२७.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |