लग्नसमारंभाच्या जेवणावळीच्या वेळी हे लक्षात घ्यावे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०९
‘लग्नसमारंभाच्या जेवणावळीच्या वेळी थोडे थोडेच वाढून घ्यावे. पदार्थ कितीही आवडीचा असला, तरी तो थोडाच खावा. स्वतःला न आवडणारा पदार्थ वाढून घेऊ नये. पानात काही टाकू नये. अन्नाला नावे न ठेवता चव घेऊन जेवावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२२)