राज्यात पुणे जिल्ह्यात लंपीमुळे होणारे मृत्यू सर्वांत अल्प !
पुणे – लंपी आजार नियंत्रणात येण्यासाठी पुणे जिल्ह्यात तत्परतेने लसीकरणावर भर दिल्यामुळे पशूंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर अल्प झाला. पुणे जिल्ह्यात ६३३, तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४ सहस्र ५१० पशूंचा मृत्यू झाला आहे. अनेक शहरांत लसीकरणावर भर न दिल्यामुळे लंपीमुळे मृत्यू झाले. लंपीमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत पुणे जिल्हा बाराव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिली.