कोरियातील यूट्यूबर महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण !
दोन्ही धर्मांधांची जामिनावर मुक्तता !
मुंबई – कोरियातील यूट्यूबर महिलेचा खार येथे विनयभंग करणारे मोबीन शेख आणि महंमद अन्सारी यांची वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणी भारताचे नाव अपकीर्त करूनही आरोपींची जामिनावर मुक्तता झाल्याने नागरिकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. दोन्ही धर्मांधांनी महिलेची छेड काढत तिला बळजोरीने ओढत दुचाकीवर बसण्यास सांगितले होते, तसेच तिचे चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. (कठोर शिक्षेअभावीच अशा वासनांधांकडून महिलांची छेड काढण्याचे किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार घडतात, हे लक्षात घ्या ! संपादक)