पाटणा उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी आरक्षणाची खिल्ली उडवली !

सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित !

पाटलीपुत्र (बिहार) – येथील पाटणा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात ते एका सुनावणीच्या वेळी आरक्षणावरून एका सरकारी अधिकार्‍यांची खिल्ली उडवतांना दिसत आहेत.

१. पाटणा उच्च न्यायालयाचे न्या. संदीप कुमार यांनी बिहार सरकारचे जिल्हा भूमीग्रहण अधिकारी अरविंदकुमार भारती यांना ‘एक भूखंड कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित असतांनाही त्याची हानीभरपाई कशी दिली ?’, असा प्रश्‍न विचारला. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी स्थगित केली आणि प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करण्यासाठी वेळ दिला.

२.  त्यानंतर न्या. संदीप कुमार यांनी भारती यांना ‘भारतीजी, तुम्ही आरक्षणाद्वारे नोकरी मिळावली आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्यावर भारती यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

३. यानंतर भारती हे न्यायालयातून बाहेर गेल्यानंतर तेथे उपस्थित काही अधिवक्ते हसू लागले. त्यांतील एक अधिवक्ता म्हणाला, ‘‘आता तुम्ही समजून घ्या.’’ त्यावर दुसरा अधिवक्ता म्हणाला ‘‘२ नोकर्‍यांएवढे पैसे मिळाले असतील.’’ त्यावर न्यायमूर्तींनी टिप्पणी केली, ‘या लोकांचे काही होणार नाही. या बिचार्‍याने जे पैसे कमावले, ते आता सगळे व्यय (खर्च) करून टाकेल.’’