भारतात आगामी काळात येणारी उष्णतेची लाट सहन करण्यापलीकडे असेल !
जागतिक बँकेच्या अहवालात दावा
नवी देहली – जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारत आधीपासून उष्णतेचा सामना करत आहे. येणार्या उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा चालू होणार असून त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे’, असा दावा केला आहे. ‘भारत जगातील पहिला देश असेल, ज्यामध्ये उष्णता मनुष्याला सहन करण्याच्या पलीकडे असणार आहे’, असेही यात म्हटले आहे.
#India May Soon Face #Heat Waves Exceeding Human Survivability Limit, Rising Heat Can Affect #Economy: #WorldBank Report
Know everything here: https://t.co/XTzrysjk1k pic.twitter.com/xJgIzYsbw3
— ABP LIVE (@abplive) December 7, 2022
जागतिक बँकेच्या ‘जलवायूमधील गुंतवणुकीची संधी’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात पुढे म्हटले आहे की, चालू वर्षी भारतात एप्रिल मासात उष्णतेची लाट आली होती. राजधानी देहलीतील तापमान ४६ सेल्सियस झाले होते.