गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय !
कर्णावती /शिमला – गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल जवळपास लागला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव झाला असून तेथे काँग्रेस ६८ पैकी ४० जागांवर विजय मिळवत सत्तेवर आली आहे, तर गुजरातमध्ये भाजपने मोठा विजय मिळवत सत्ता कायम ठेवली आहे. येथे भाजपला १८२ पैकी १५७ जागा मिळाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने भाजपला पहिल्यांदाच जागा मिळाल्या आहेत.
#AssemblyElectionResults2022 PHOTOS
BJP’s celebratory dance in Gujarat, Congress exudes confidence in Himachalhttps://t.co/pMyWnObuZ4
— Financial Express (@FinancialXpress) December 8, 2022
१. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला २५ जागा मिळवता आल्या आहेत, तर आम आदमी पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षांचा अनुभव पहाता जनता ५ वर्षांनी सत्तापालट करत असल्याचे दिसत आहे. येथे पूर्वी काँग्रेस सरकार होते. जनतेने काँग्रेसला हटवून भाजपला सत्तेवर बसवले होते आणि आता भाजपला हटवून पुन्हा काँग्रेसच्या हातात सत्ता दिली आहे.
२. गुजरातमध्ये काँग्रेसला १७, तर आम आदमी पक्षाला ५ जागा मिळाल्या आहेत. आपने येथे खाते उघडले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसची मते घेतल्याने काँग्रेसला तोटा, तर भाजपला लाभ झाल्याचे म्हटले जात आहे.
भाजप काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याची काँग्रेसला भीती
छत्तीसगड काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, हिमाचलमध्ये मतमोजणी चालू आहे. तेथे काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे. भाजपवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आम्ही आमचे नवनिर्वाचित आमदार सांभाळून ठेवू. त्यांना कुठे न्यायचे हे नंतर ठरवले जाईल.