कतारमधील विश्वचषक स्पर्धेत केरळच्या धर्मांध फुटबॉल चाहत्यांकडून ‘बाबरी मशीद पुन्हा बांधा’ फलक प्रदर्शित
धर्मांधांचा कट्टरवाद !
दोहा – कतारमधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अल्-वक्राह येथील लुसेल मैदानावर पोर्तुगाल आणि स्विझरलँड यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्याच्या वेळी केरळच्या धर्मांध फुटबॉल चाहत्यांनी ‘बाबरी मशीद पुन्हा बांधा’ अशी मागणी करणारे फलक प्रदर्शित केले.
A banner in support of rebuilding #BabriMasjid was displayed by Keralite football fan at the Lusail Stadium in Al-Wakrah at #WorldCup2022 in #Qatar. https://t.co/inJDUibkHW #FifaWWorldCup2022
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) December 7, 2022
केरळमधील तरुण सैफुद्दीन जैफ याने प्रदर्शित केलेल्या फलकावर ‘बाबरी मशिदीची पुनर्बांधणी करा’, ‘अन्यायाची ३० वर्षे’, असे लिहिले होते. त्यावर मशिदीचे चित्र रेखाटण्यात आले होते. फेसबुक वापरकर्ता यासर मोईडू याने हा फलक घेतलेल्या तरुणाचे छायाचित्र प्रसारित केले आणि त्याखाली ‘ सैफुद्दीन जैफ, एक मित्र आणि चळवळीचा सहकारी’, असे लिहिले आहे.