महाड येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या १४ गोवंशियांची सुटका, ३ धर्मांधांना अटक
महाड – महाड (चांढवे) येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या १४ गोवंशियांची गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने सुटका केली. या प्रकरणी ३ धर्मांधांना महाड एम्.आय.डी.सी. पोलिसांनी अटक केली आहे. फैजुला फजलअंतुले, बशीर महमुद अंतुले, फजल अहमद अब्दुला अंतुले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
महाड-पोलादपूर यांच्या मध्यभागी असलेल्या चांढवे गाव येथे गोवंशियांची हत्या होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी गोरक्षक दीपक उत्तेकर, दिनेश दरेकर, जयेश जगताप, सुमित दरेकर, सागर साळुंखे, उमेश पालकर, नितीन धनावडे, दीपक शिंदे, गणेश येरूनकर यांच्यासह घटनास्थळी धाड टाकून १४ गोवंशियांची सुटका केली. या ठिकाणी ३ गोवंशियांची हत्या केल्याचे आढळून आले.
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना धर्मांध उघडपणे गोवंशाची वाहतूक करणे, त्यांची हत्या करणे, मांस विक्री करणे असे प्रकार करत आहेत. या कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. अशा कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल ! |