सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा ५२ वा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !
रामनाथी, ७ डिसेंबर (वार्ता.) – दत्तजयंती ! शरणागतांच्या भवतापांचे हरण करणार्या श्री दत्तगुरूंच्या महिमेचे गुणगान करण्याचा हा दिवस ! त्याचसमवेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा हा वाढदिवस ! एरव्ही सप्तर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी दैवी प्रवास करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा यंदाचा ५२ वा वाढदिवस सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात एका अनौपचारिक भावसोहळ्याद्वारे साजरा करण्यात आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कुटुंबीय आणि काही साधक यांच्या उपस्थितीत हा भावसोहळा पार पडला.
या शुभप्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भेटवस्तू दिली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले, तसेच सप्तर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी काढलेल्या गौरवोद्गारांविषयी उपस्थितांना अवगत केले. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासह अन्य कुटुंबियांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये कथन केली.
सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.