दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’विषयी आलेली अनुभूती !
‘७.१२.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ची विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली होती. ७.१२.२०२२ या दिवशी सकाळी ही विशेष पुरवणी हातात घेऊन तिच्याकडे बघितल्यावर मन शांत आणि निर्विचार झाले. एरव्ही असे काही वेगळे लिखाण प्रसिद्ध झाल्यानंतर ‘ते लिखाण कधी एकदा वाचतो’, अशी आपल्या मनाला उत्सुकता वाटत असते. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’ हातात घेतल्यानंतर मात्र ‘ते लिखाण पटकन वाचावे’, असे न वाटता ‘पुरवणीतील आध्यात्मिक स्पंदने अनुभवतच रहावी’, असे वाटले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याही उच्च आध्यात्मिक स्थितीला, म्हणजेच निर्गुण स्थितीला असल्यानेच त्यांच्याविषयी लिखाण प्रसिद्ध झालेल्या पुरवणीतही उच्च आध्यात्मिक स्पंदने निर्माण झाली आहेत आणि ती प्रक्षेपितही होत आहेत’, असे लक्षात आले.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे पती), पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |