गोरक्षक सागर श्रीखंडे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी वाचवले गायीचे प्राण !
निपाणी (कर्नाटक) – राष्ट्रीय महामार्गावरील आरोरा आस्थापनाच्या शेजारी एका गायीला अज्ञात वाहनाने धडक बसल्याने तिचा पाय मोडला, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी ‘समाधी मठा’च्या गोरक्षक विभागाचे श्री. सागर श्रीखंडे यांना कळवली. श्री. सागर आणि त्यांचे सहकारी तात्काळ तेथे रवाना झाले. गोरक्षक श्री. सागर श्रीखंडे यांनी शासकीय प्राणी वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली. यानंतर निपाणी येथील नगर पालिकेच्या आयुक्तांनी या गोमातेला पुढील उपचारांसाठी नेण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली. सध्या या गोमातेस देवचंद महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या प्रसन्नकुमार गुजर यांच्या गोशाळेत ठेवण्यात आले आहे.