पुण्यात भुयारी मार्गावर ‘मेट्रो’ची पहिली यशस्वी चाचणी !
पुढील वर्षात मेट्रो चालू होण्याची शक्यता !
पुणे – येथील भूमीगत मेट्रोच्या पहिल्या ३ कि.मी. टप्पा असलेल्या मार्गावर ७ डिसेंबर या दिवशी पहिली चाचणी पार पडली. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली. मार्च २०२३ पर्यंत पुणे मेट्रो चालू करण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्धार आहे. पुण्यातील पहिल्या भूमीगत मेट्रो स्थानकाचे काम हे ८५ टक्क्यांहून अधिक झाल्याची माहिती मेट्रोच्या अधिकार्यांनी दिली आहे. भूमीगत स्थानकावर झालेली चाचणी हे पुणे मेट्रोसाठी एक नवीन आणि यशस्वी पाऊल आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना भूमीगत मार्गावरील मेट्रोत प्रवास करता येणार आहे.
पुणे मेट्रोसाठी एकूण ११ सहस्र ४२० कोटी रुपये व्यय येणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे हा पहिला टप्पा सध्या चालू करण्यात आला आहे. या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.