महाराष्ट्राच्या गाड्या फोडणार्यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाविषयी माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमवेतही माझी चर्चा झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी संयम पाळायला हवा. यावर तोडगा निघेल; परंतु सीमाभागात मराठी भाषिकांना कोणताही त्रास होता कामा नये. ज्यांनी महाराष्ट्रातील गाड्या फोडल्या, त्यांच्यावर कर्नाटक सरकारने कारवाई करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.