शौर्य दिनाची पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी दिग्रस येथे हिंदु युवकावर धर्मांधांकडून आक्रमण !
दिग्रस (यवतमाळ) – येथील दुचाकी दुरुस्तीच्या दुकानात काम करणारे श्री. उमेश जाधव (वय २२ वर्षे) यांना ५ ते ७ धर्मांधांनी मारहाण केली. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. ‘शौर्य दिनाच्या निमित्ताने ‘इंस्टाग्राम’च्या खात्यावर पोस्ट का ठेवली ?’, अशी विचारणा करत धर्मांधांनी त्यांना मारहाण केली.या प्रकरणी साहिल मेहबूब नवरंगाबाद, सय्यद कासिफ सय्यद परवेज, महंमद साहिल महंमद मतीन, तसेच अन्य आरोपी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धर्मांधांवर कारवाईची मागणी हिंदूंनी केली आहे.
संपादकीय भूमिकाअसे व्हायला दिग्रस भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ? |