बांगलादेशमध्ये विवाहित हिंदु महिलेवर सत्ताधारी अवामी लीगच्या ३ मुसलमान नेत्यांकडून सामूहिक बलात्कार
बलात्काराचे चित्रीकरण करून पीडितेच्या मोठ्या मुलाला पाठवले !
ढाका (बांगलादेश) – अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना लालमोनिरहाट येथे घडली. बलात्कार्यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि कायदेशीर तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.
3 Awami League leaders gang-raped a Hindu mother, the rape took place in Lalmonirhat, Bangladesh.The rapists recorded a video and sent it to her eldest son and threatened to post it on social media if any legal complaint was Lodged. But the police is not taking any complaint. pic.twitter.com/8yNdxxg3lJ
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) December 7, 2022
दुसर्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, असद मिया, मिलन मिया आणि कुलू मिया अशी बलात्कार करणार्यांची नावे आहेत. पोलीस अशा घटनांची तक्रार नोंदवून घेत नाहीत. प्रसारमाध्यमेही या विषयी मौन बाळगून आहेत. आरोपी अवामी लीगचे प्रभावशाली नेते असल्याने १० दिवस उलटूनही पोलीस गुन्हा नोंदवून घेत नाहीत.
संपादकीय भूमिका
|