ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांच्या कारवाया रोखण्यासाठी परदेशी नागरिकांच्या व्हिसाची तपासणी होणार !
कॅनबेरा (आस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून भारतविरोधी कारवाया चालू आहेत. आता यांवर कठोर कारवाई करण्याची सिद्धता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केली आहे. ‘क्वाड’ (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रलिया या देशांची संघटना) नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. त्यासंदर्भात ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे अधिकार्यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. भारताविरुद्धचे षड्यंत्र रोखण्यासाठी सरकार आता त्या सर्व परदेशी नागरिकांच्या व्हिसाची तपासणी करत आहे, ज्यांना भारताविरुद्ध खलिस्तान बनवण्याच्या बाजूने सार्वमत घ्यायचे आहे.
ऑस्ट्रेलिया में भारत विरोधी गतिविधियों पर सख्त एक्शन लेगी सरकार: खालिस्तानी साजिशों को लेकर हुई बैठक, नेताओं के वीजा की होगी जांच#Australia #Khalistan https://t.co/bYnXiIyuIF
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) December 7, 2022
१. १९ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात खलिस्तान्यांनी त्यांचे झेंडे फडकवले होते. या कार्यक्रमाला तेथील सरकारने निधी दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात उपस्थित भारतीय अधिकार्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली होती.
२. एका अधिकार्याने सांगितले की, ऑस्ट्रेलियातील अनेक विदेशी घटकांकडून भारतविरोधी मोहीम राबवली जात असल्याने आम्ही चिंतित आहोत.
३. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि गृह व्यवहार मंत्री क्लेअर ओ’नील यांनाही ऑस्ट्रेलियाच्या अधिकार्यांनी कळवले की, ते लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतात; पण आता या स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीतरी चुकीचे घडत असल्याचे दिसते.