हिमाचल प्रदेश विश्वविद्यालयात साम्यवाद्यांच्या विद्यार्थी संघटनेकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण
शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील हिमाचल प्रदेश विश्वविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि साम्यवाद्यांची विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यात अभाविपचे ८ ते १० जण घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. हाणामारीच्या वेळी पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या येथे तणावाची स्थिती आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि साम्यवाद्यांची विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत
Campus violence: Students injured after ABVP, SFI workers clash in Himachal Pradesh University.https://t.co/QD3NT5Ij6O
— TIMES NOW (@TimesNow) December 7, 2022
संपादकीय भूमिकासाम्यवाद्यांचा इतिहास हा हिंसाचाराचाच असल्याने त्यांच्याकडून याहून वेगळे काही घडण्याची शक्यता नाही. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! |