श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून बहिणीच्या साधनेचे कौतुक ऐकल्यानंतर स्वतःही साधनेला आरंभ करणे !
८ – ९ वर्षांपूर्वी आम्ही सर्व जण नातेवाईकांकडे गेलो होतो. त्या वेळी माझे साधनेकडे विशेष लक्ष नव्हते. तेव्हा माझी धाकटी बहीण सौ. शीतल गोगटे मनापासून साधना करत होती. अंजलीताई शीतलच्या साधनेचे प्रयत्न सांगून तिचे कौतुक करत होती. या प्रसंगात मला पुष्कळ वाईट वाटले; पण या प्रसंगामुळे माझ्या मनात साधनेचे बीज रोवले गेले. मला ‘नामजप आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करावी’, असे प्रकर्षाने जाणवू लागले. देवाने हा प्रसंग घडवल्यामुळे मी मनापासून साधना करू लागले आणि त्यातला आनंदही मला अनुभवता येऊ लागला.
‘गुरुदेवा, सौ. अंजलीताई जे मार्गदर्शन करील, ते मला ग्रहण करता येऊ दे’, अशी प्रार्थना !’
– सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची लहान बहीण) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४८ वर्षे,), फोंडा, गोवा. (२०.११.२०२२)
घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी ।
आपले मूल कितीही मोठे झाले, तरी आईला ते एखाद्या बाळासमानच वाटते. ताईचा माझ्याबद्दल असाच प्रेमभाव आहे. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी ।’, याप्रमाणे ताई आमच्यापासून कितीही दूर असली, तरी तिचे लक्ष सर्वांकडे असते. सौ. अंजलीताई केवळ माझी बहीण नसून ती साधनेतील माझी मायाळू आई आहे.
– सौ. मधुरा सहस्रबुद्धे