ॐकार ज्याचा वाचक । जगध्देतू धीप्रेरक । तोचि देव सच्चित्सुख । एक दत्त ।।
आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्याविषयी बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा दत्त आहे.