दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) दत्ताच्या नामजपामुळे मर्त्यलोकात अडकलेल्या अतृप्त पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्या त्रासाचे प्रमाण घटते.